
सोलापूर : राज्यातील खासगी आणि सहकारी दूध संघांनी गाईच्या दुधाचा खरेदी दर सोमवारपासून (ता. १) प्रतिलिटर एक रुपयांनी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या आधी एक ऑगस्टला एक रुपया आणि २१ ऑगस्टला एक रुपया याप्रमाणे दोनवेळा दरवाढ करण्यात आली. त्यानंतर आता पुन्हा तिसऱ्यांदा एक रुपया वाढवण्यात आल्याने गाईच्या दुधाचा प्रतिलिटर दर ३५ रुपयांवर पोचला. पण पशुखाद्याचे वाढते दर आणि अन्य खर्च या आधीच आवाक्याबाहेर गेल्याने हा दर केवळ खर्चाच्या तोंडमिळवणी पुरताच ठरणारा असल्याची वस्तुस्थिती आहे.