या दूध संघाने शेतकऱ्यांचे थकविले कोट्यवधी रुपये 

या दूध संघाने शेतकऱ्यांचे थकविले कोट्यवधी रुपये 
Updated on

सोलापूर ः जिल्ह्यात खासगी दूध संस्थांमार्फत दूध संकलन करण्यापूर्वी सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघ दूध व्यवसायामध्ये अग्रेसर होता. मात्र, तोच दूध संघ आता दूध उत्पादकांना दुधाचे बिलही देऊ शकत नाही. मागील जवळपास दोन महिन्यांपासून दूध उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे दुधाचे बिल जिल्हा दूध संघाने दिले नाही. त्यामुळे दूध संघाबाबत दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. 

जिल्ह्यात पूर्वी जिल्हा दूध संघ अर्थात "दूधपंढरी'चा बोलबाला होता. जिल्हा दूध संघ जो दर ठरवेल त्याच दराप्रमाणे इतरांनाही शेतकऱ्यांना पैसे द्यावे लागत होते. मात्र, मागील काही वर्षामध्ये जिल्ह्यात खासगी दूध संघाने मोठ्या प्रमाणात मुसंडी मारत जिल्हा दूध संघाला संकलनामध्येही मागे टाकले आहे. पूर्वी दोन-सव्वादोन लाखाच्या आसपास असलेले जिल्हा दूध संघाचे दैनंदिन दूध संकलन आता केवळ 60 हजारावर येऊन ठेपले आहे. त्याला अनेक गोष्टी कारणीभूत ठरल्या आहेत. बदलत्या धोरणाप्रमाणे जिल्हा दूध संघाने आपल्या धोरणामध्येही बदल करायला हवा होता. पण, तसे न झाल्याने खासगी दूध संघांनी जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे खासगी दूध संघाने जिल्हा दूध संघाला दिलेल्या या धक्‍यातून सहकारी तत्त्वावर असलेला व दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण असलेला हा जिल्हा दूध संघ सावरणार का? हा खरा प्रश्‍न आहे. 

जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष आमदार प्रशांत परिचारक यांनी सूत्रे घेतल्यापासून त्यांनी चांगले कामकाज केले होते. गेल्या जवळपास 12 ते 15 वर्षापासून संघाची चावी आमदार परिचारक यांच्या हातात आहे. पण, आताची स्थिती संघासाठी खूपच धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी दूध उत्पादक शेतकऱ्यांना 10 दिवसाला दुधाचे बिल दिले जात होते. त्यामुळेच दूध उत्पादकांचाही संघावर विश्‍वास होता. त्या विश्‍वासास जिल्हा दूध संघाने कुठेतरी तडा लावल्याचे आज सुरू असलेल्या सगळ्या घडामोडींवरून दिसून येते. मागील दोन महिन्यांपासून दूध उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे देण्यास जिल्हा दूध संघ असमर्थ ठरला आहे. ही स्थिती नेमकी कशामुळे निर्माण झाली याकडे संघाच्या कारभाऱ्यांनी गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. एक डिसेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीतील दुधाचे बिल संघाने दूध उत्पादकांना दिले आहे. त्यानंतरचे म्हणजेच जवळपास दोन महिन्यापासूनचे बिल अद्यापही न दिल्याने उत्पादकांमध्ये नाराजी पसरली आहे. 10 दिवसांऐवजी संघ आता 20 दिवसांनी दुधाचे बिल देत आहे. जिल्हा दूध संघाकडे जवळपास अडीच हजार सहकारी दूध संस्थांची नोंदणी आहे. त्यापैकी जवळपास 950 संस्था अवसायनात निघाल्या आहेत. उर्वरित दीड हजार संस्थांपैकी जवळपास 800 संस्था संघाला दुधाचा पुरवठा करतात. उर्वरित सर्व संस्था खासगी दूध संघांना दुधाचा पुरवठा करत आहेत. याला संघाचे व्यवस्थापन जबाबदार असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

The mortal remains of Indian Army soldier Vaibhav Avtade were accorded a state funeral at his native village Ganeshwadi in Mangalwedha, Solapur district.
solapur-pune highway
solapur
solapur issues of voters
Marathi News Esakal
www.esakal.com