"एमआयएममध्ये येण्यास अनेकजण इच्छुक! उत्तर-दक्षिणमध्येही घालणार लक्ष' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

"एमआयएममध्ये येण्यास अनेकजण इच्छुक! उत्तर-दक्षिणमध्येही घालणार लक्ष'

शहराध्यक्ष शाब्दी म्हणाले, सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदार संघ हा तर एमआयएमचा बालेकिल्ला आहेच.

'एमआयएममध्ये येण्यास अनेकजण इच्छुक! उत्तर-दक्षिणमध्येही लक्ष'

सोलापूर : एमआयएममधील (MIM) एकही पदाधिकारी अद्यापपर्यंत पक्षाला सोडून अन्य पक्षात गेलेला नाही. काही नगरसेवक राष्ट्रवादीत (NCP) जाणार असल्याची चर्चा आम्हीही ऐकतो. अद्यापपर्यंत एकाही नगरसेवकाने एमआयएम सोडलेले नाही. एमआयएमचा वाढता जनाधार पाहता आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर एमआयएममध्ये येण्यासाठी अनेक कार्यकर्ते इच्छुक आहेत. लवकरच एमआयएममध्ये इनकमिंग झालेले तुम्हाला दिसेल, अशी माहिती एमआयएमचे शहराध्यक्ष फारुख शाब्दी (MIM's Solapur City President Farooq Shabdi) यांनी पत्रकार परिषदेत दिली. कोकणातील (Konkan) पूरग्रस्तांसाठी (Flood) सोलापूर एमआयएमच्या वतीने मदतीचा हात देण्यात आला आहे. जीवनावश्‍यक वस्तू घेऊन वाहन सोलापुरातून रवाना झाले. त्या वेळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (MIM City President Shabdi said that soon will start incoming to MIM-ssd73)

हेही वाचा: 'एमपीएससी'तर्फे मेगाभरती ! आयोगाच्या सदस्यांची नावे अंतिम

शहराध्यक्ष शाब्दी म्हणाले, सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदार संघ हा तर एमआयएमचा बालेकिल्ला आहेच. याशिवाय शहर उत्तर आणि सोलापूर दक्षिण या दोन्ही विधानसभा मतदार संघात एमआयएम अधिक भक्कम करण्यासाठी मी लक्ष घातले आहे. आगामी महापालिका निवडणुकीत एमआयएमचा करिष्मा सर्वांना नक्कीच दिसेल. ज्या ठिकाणी एमआयएमचा नगरसेवक निवडून येऊ शकतो अशा ठिकाणच्या सर्व जागा लढविण्याचा निर्णय झाला आहे. आगामी महापालिका निवडणुकीत एमआयएमचे किमान वीस नगरसेवक दिसतील, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा: नियम डावलून पळविल्या म्हशी ! दहाजणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा

पक्ष बांधणीला प्राधान्य

सोलापुरात कोणताही कार्यकर्ता नसताना, संघटनात्मक बांधणी नसताना 2014 च्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमने शहर मध्यमधून दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली. 2017 च्या महापालिका निवडणुकीत एमआयएमचे 9 नगरसेवक झाले. एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदोद्दिन ओवेसी आणि आमदार अकबरोद्दिन ओवेसी यांच्या प्रेमापोटी सोलापूरकरांनी एमआयएमला भरभरून साथ दिली. एमआयएममध्ये संघटनात्मक बांधणीला मी सुरवात केली आहे. विद्यार्थी, वाहतूक, युवक, महिला आणि मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह विंगच्या माध्यमातून एमआयएमला संघटनात्मकपणे बांधले आहे. याचे चांगले परिणाम महापालिकेच्या आगामी निवडणुकीत दिसती,÷िअसा विश्‍वासही शहराध्यक्ष शाब्दी यांनी व्यक्त केला.

Web Title: Mim City President Shabdi Said That Soon Will Start Incoming To Mim

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :maharashtraupdateMIM
go to top