
सोलापूर : एसटी बसने अक्कलकोटला निघालेल्या प्रवाशाच्या पर्सची चेन उघडून चोरट्याने सव्वालाखाचे सोन्याचे मिनी गंठण चोरून नेले. शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास रंगभवन ते शांती चौक पाण्याची टाकी दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.