esakal | 'राजकारणात कोणाला पाणी पाजायचे असेल तर आपल्याकडे पाणी असावे लागते!' | Political News
sakal

बोलून बातमी शोधा

'राजकारणात कोणाला पाणी पाजायचे असेल तर आपल्याकडे पाणी असावे लागते!'
'राजकारणात कोणाला पाणी पाजायचे असेल तर आपल्याकडे पाणी असावे लागते!'

'राजकारणात कोणाला पाणी पाजायचे असेल तर आपल्याकडे पाणी असावे लागते!'

sakal_logo
By
दत्तात्रय खंडागळे

सांगोला (सोलापूर) : राजकारणी हे खरे नटसम्राट असतात, त्यांना सर्व प्रकारच्या भूमिका पार पाडाव्या लागतात. शिवसेनेमध्ये (Shivsena) सामाजिक कामांना नेहमीच प्राधान्य दिले जाते. त्यामुळेच आज एक टपरीवाला शिवसेनेच्या माध्यमातून मंत्री होतो. राजकारणात कोणाला पाणी पाजायचे असेल तर आपल्याकडे पाणी असावे लागते. बापू, तुम्ही काळजी करू नका, हा पाणीपुरवठा मंत्री तुमच्या पाठीशी आहे. तालुक्‍यातील एकही गाव पाण्यावाचून वंचित राहणार नाही. 81 गावची पाणीपुरवठा योजना यापुढेही सुरू राहणार आहे, अशी ग्वाही पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी दिली.

शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी गुरुवारी (ता. 14) सांगोला येथील कार्यकर्त्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील बोलत होते. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राज्याचे उपाध्यक्ष दीपक साळुंखे- पाटील, शिवसेनेचे भाऊसाहेब रुपनर, डी. व्ही. पी. ग्रुपचे प्रमुख अभिजित पाटील, कॉंग्रेसचे प्रा. पी. सी. झटके, संभाजी शिंदे, रफिक नदाफ, बाबुराव गायकवाड, तानाजी पाटील, शहाजी नलवडे, सूर्यकांत घाडगे, कमरुद्दीन खतीब, गुंडादादा खटकाळे आदी उपस्थित होते.

हेही वाचा: कोण आहे पवारांच्या डोक्‍यातील विधानपरिषद निवडणुकीसाठीचा उमेदवार?

मंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले, तिन्ही पक्षांच्या महाविकास आघाडीची गाडी सध्या सुसाट आहे. हे महाविकास आघाडीचे सरकार आपले कार्यकाल पूर्ण करेल. आज कोण जास्त बोलतो त्याच्यावर ईडी लावली जाते. चौकशी करायला काहीच हरकत नाही; परंतु सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे.

आमदार शहाजी पाटील म्हणाले, सांगोला तालुक्‍याची दुष्काळाची ओळख होती ती बदलण्याचे काम सध्या करावे लागत आहे. सांगोला तालुक्‍यातल्या विविध टेंभू, म्हैसाळ शिरभावी पाणीपुरवठा यांसारख्या विविध योजना शिवसेनेच्याच सहकार्याने पूर्ण झाल्या आहेत. 650 कोटी रुपयांची "स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना' लवकरच कार्यान्वित होणार आहे.

दीपक साळुंखे-पाटील म्हणाले, तालुक्‍यात राजकारण करायला वयाची मर्यादा नाही. सांगोल्यातील महाविकास आघाडी राज्याच्या महाविकास आघाडीच्या अगोदरच निर्माण झाली आहे.

'लाव रे ईडी!'

मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, आज-काल कोणी मंत्री, आमदार, खासदार जास्त बोलू लागला की त्याच्यावर ईडीची चौकशी सुरू होते. चौकशी करायला काहीच हरकत नाही, परंतु कोणी जास्त मालमत्ता मिळवली या सर्वांचीच चौकशी झाली पाहिजे.

हेही वाचा: प्रणितीताई, पालकमंत्र्यांसारखे धावते दौरे बरं नव्हं !

राज्याच्या महाआघाडीची सांगोल्यातून सुरवात

राज्यात विधानसभेच्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचे सरकार बनले. परंतु विधानसभेच्या वेळीच सांगोल्यात राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा देऊन एकत्र काम केले. त्यामुळे सांगोला येथील महाविकास आघाडी राज्याच्या महाविकास आघाडी अगोदरच झाली आहे, असे माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांनी सांगितले.

loading image
go to top