
शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी मात्र या महामार्गाला आपला विरोध कायम असल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. दोन दिवसापूर्वी त्यांनी महामार्गाच्या विरोधात कोल्हापुरात आंदोलन देखील केले.
पंढरपूर : नागपूर ते गोवा या प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाच्या (Nagpur to Goa Shaktipeeth Highway) विरोधात सुरुवातीला दंड थोपटणारे राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी आता मात्र यू टर्न घेत विरोधाची भूमिका मवाळ केली आहे.