esakal | संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत दक्ष राहा! वडेट्टीवारांच्या सूचना
sakal

बोलून बातमी शोधा

संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत दक्ष राहा! वडेट्टीवारांच्या सूचना

जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे, ही समाधानाची बाब आहे; मात्र संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत प्रत्येक यंत्रणेने दक्ष राहावे, अशा सूचना मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिल्या.

संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत दक्ष राहा ! वडेट्टीवारांच्या सूचना

sakal_logo
By
अरविंद मोटे

सोलापूर : जिल्ह्यातील कोरोना (Covid-19) रुग्णांची संख्या कमी होत आहे, ही समाधानाची बाब आहे; मात्र संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत (Third Wave of Corona) प्रत्येक यंत्रणेने दक्ष राहावे, अशा सूचना मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी दिल्या. वडेट्टीवार यांनी शासकीय विश्रामगृह येथे जिल्ह्यातील कोरोना स्थिती, आश्रमशाळा, कायदा व सुव्यवस्था (Law and order), चारा छावणी याबाबत आढावा घेतला, त्या वेळी ते बोलत होते.

हेही वाचा: मोठा निर्णय! ग्रामसेवक, सरपंच ठरवणार गावगाड्यातील भटक्‍यांची जात

बैठकीला आमदार प्रणिती शिंदे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, पोलिस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त कैलास आढे उपस्थित होते.

जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव संपलेला नसल्याने सर्व संबंधित यंत्रणांनी आवश्‍यक काळजी घेऊन उपाययोजना कराव्यात. कोरोना संसर्गाची तिसरी लाट येण्याची शक्‍यता शास्त्रज्ञांनी वर्तविली असून, लहान मुले बाधित होण्याची शक्‍यता असल्याने त्यांच्या उपचारासाठी आवश्‍यक हॉस्पिटलची निर्मिती, मुबलक औषधसाठा उपलब्ध ठेवावा. लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. कोरोनासाठी काही कठोर निर्णय घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन करणे हिताचे आहे, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले. सेटलमेंटमध्ये म्हाडाच्या घरांचा प्रस्ताव, सांस्कृतिक सभागृहाचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधितांना दिल्या. जिल्हाधिकारी श्री. शंभरकर यांनी चारा छावण्यांच्या निधीबाबत सांगितले. यावर वडेट्टीवार यांनी प्रस्तावाला मंत्रालय स्तरावरून मान्यता देण्यात येईल, असे सांगितले.

हेही वाचा: अक्कलकोट तालुक्‍यातील उत्तर भागात दमदार तर दक्षिणमध्ये तुरळक पाऊस

जिल्ह्यातील आश्रमशाळांच्या गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न करा, टॅबचे संनियंत्रण करा, तांडा वस्तीचा प्रस्ताव आणि घरकुलांच्या 30 कोटींच्या प्रस्तावाला मंत्रालय स्तरावरून मंजुरी देण्यात येईल, असेही वडेट्टीवार यांनी सांगितले. जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबतही त्यांनी आढावा घेतला. कोरोना महामारीतील गुन्ह्यांचे प्रमाण, महिलांवरील अत्याचाराबाबत त्यांनी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडून माहिती घेतली.

सोलापूर शहराच्या पाण्याबाबत योग्य नियोजन करून पुनर्वापर प्रक्रिया राबवा, ग्रीन बिल्डिंगसाठी प्रयत्न करण्याच्या सूचनाही वडेट्टीवार यांनी केल्या. मुलांना संभाव्य धोका ओळखून जिल्ह्यात 1400 बेडची क्षमता तयार केली आहे. यामध्ये 1200 शासकीय, खासगी आणि छत्रपती शिवाजी महाराज सर्वोचार रुग्णालयात 100 साधे, 50 अतिदक्षता बेडची क्षमता तयार ठेवली आहे. जी मुले नियमित लसीकरणापासून वंचित आहेत, त्यांचे "इंद्रधनुष्य'मध्ये पूर्ण लसीकरण करण्यात येणार आहे. कुपोषित बालके, गरोदर माता आणि को-मॉर्बिड रुग्ण, दुर्धर आजाराची बालके यांच्या घरातील 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्याचे नियोजन असल्याची माहिती या वेळी देण्यात आली.

loading image
go to top