मंगळवेढा : शहरातील एका शैक्षणिक संस्थेत एकाच वर्गात शिकणाऱ्या १२ वर्षांच्या अल्पवयीन तीन मैत्रिणी जिवाची हौस करण्यासाठी घरात कुणाला काही न सांगता मुंबईला निघाल्या. पण पोलिसांच्या मुस्कान पथकाने वेगाने तपासाची चक्रे फिरवून अखेर पंढरपूर बस स्थानकावरून त्यांना ताब्यात घेतले.