Miraj Incident : तीन मजली इमारतीवरून पडून दीड वर्षांचे बाळ गंभीर मिरज येथे मंगळवार पेठेतील घटना

One-and-a-Half-Year-Old Baby Seriously Injured in Miraj : मिरजच्या मंगळवार पेठ परिसरात तीन मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने दीड वर्षांचे बाळ गंभीर जखमी झाले.
Miraj Incident

Miraj Incident

esakal

Updated on: 

मिरज : शहरातील मंगळवार पेठ परिसरात तीन मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने दीड वर्षांचे बाळ गंभीर जखमी झाले. ही घटना आज घडली. जखमी बाळाला नागरिकांनी तातडीने मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. बाळाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.

मंगळवार पेठ परिसरात सध्या यात्रेनिमित्त परजिल्ह्यांतून मोठ्या संख्येने नागरिक तसेच नातेवाइक आले आहेत. त्यापैकी एका कुटुंबातील दीड वर्षांचे बाळ इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर खेळत होते.

Miraj Incident
Dabhatt E-Pik Pahani : दाभट गावातील ई-पीकपाहणी शंभर टक्के पूर्ण मंडणगड तालुक्यातील पहिले गाव; प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यात यश

खेळत असताना अचानक तोल गेल्याने बाळ खाली जमिनीवर कोसळले. बाळ इमारतीवरून खाली पडल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या बाळाला तातडीने उचलून रुग्णवाहिकेतून मिरज शासकीय रुग्णालयात नेण्यात आले.

तेथे डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे मंगळवार पेठ परिसरात काही काळ खळबळ उडाली. यात्रेच्या काळात परिसरात मोठी गर्दी होत असल्याने लहान मुलांच्या सुरक्षिततेकडे लक्ष देण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com