

Dabhatt E-Pik Pahani
esakal
मंडणगड : महसूल विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या ‘ई-पीकपाहणी’ मोहिमेला मंडणगड तालुक्यात वेग आला आहे. तालुक्यातील दाभट गावाने सर्वाधिक वेगाने १०० टक्के ई-पीकपाहणी पूर्ण करून तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे तर मुरादपूर गावाने १०० टक्के उद्दिष्ट गाठत दुसरे स्थान पटकावले आहे.
महसूल अभिलेखातील सातबारा उताऱ्यावर पिकांची नोंद अत्यंत अचूक व अद्ययावत राहावी यासाठी शासनाच्यावतीने डिजिटल पद्धतीने ही मोहीम राबवली जात आहे. सध्या तालुक्यात खरीप व बहुवार्षिक फळपिकांच्या नोंदणीचे काम ई-पीकपाहणी सहाय्यकांच्या माध्यमातून वेगाने सुरू आहे.
या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मंडणगड, म्हाप्रळ, देव्हारे आणि वेसवी या महसूल मंडळांतील सहाय्यकांसाठी तालुकास्तरीय प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. यामध्ये सहाय्यकांना प्रत्यक्ष शेताच्या बांधावर नेऊन ‘ई-पीक पाहणी’ ॲपच्या वापराबाबत प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले.
तहसीलदार अक्षय ढाकणे, मंडळ अधिकारी नीलेश गोडघासे आणि ग्राममहसूल अधिकारी हिरा ठोंबरे यांनी स्वतः शेताच्या बांधावर जाऊन या कामाची पाहणी केली व मार्गदर्शन केले. दाभट गावातील ई-पीकपाहणी सहायक मुराद तांडेल आणि स्थानिक पोलिसपाटील यांच्या विशेष प्रयत्नांमुळे उद्दिष्ट सर्वात आधी पूर्ण झाले, तर मुरादपूर गावात सहायक नाझिमा खलपे व पोलिसपाटील यांचे विशेष योगदान आहे.
"पीकविमा, नैसर्गिक आपत्तीची शासकीय भरपाई, पीककर्ज आणि विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी सातबारावर पिकांची अचूक नोंद असणे अत्यंत आवश्यक आहे. तालुक्यातील उर्वरित गावांतील शेतकऱ्यांनी आपल्या खरिप व बहुवार्षिक पिकांची नोंदणी ई-पीकपाहणीद्वारे वेळेत पूर्ण करावी. अडचणींसाठी संबंधित ई-पीकपाहणी सहाय्यक किंवा ग्राममहसूल अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा."
- अक्षय ढाकणे, तहसीलदार, मंडणगड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.