
police search for missing rickshaw driver from Poona Naka to Degav bridge; CDR used, but no success yet.
Sakal
सोलापूर : जुना पूना नाका येथील जुन्या दगडी पुलाजवळ पाण्यात रिक्षा उभी करून बेपत्ता झालेल्या सतीश शिंदे याचा दुसऱ्या दिवशीही शोध लागलेला नाही. राज्य आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकातील चारजण, महापालिकेचे पाच व अग्निशामकच्या कर्मचाऱ्यांनी त्याचा सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत शोध घेतला. पण, तो सापडला नाही. त्यामुळे आता फौजदार चावडी पोलिसांनी त्याचा सीडीआर (कॉल डिटेल्स रेकॉर्ड) काढला जाणार असून त्यावरून त्याचा शोध घेतला जाणार आहे.