
पांगरी : वाघाने धाराशिव जिल्हा सोडल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. पाण्याच्या दुर्भिक्षामुळे तो एखाद्या पाणवठ्याशेजारी विसावला असण्याचीही शक्यता वनविभागाने वर्तविली आहे. कसून पाहणी करूनही दहा दिवसांपासून वनविभागाला तो आढळून आलेला नाही. त्यामुळे या शक्यता वर्तविण्यात येत आहेत.