
पंढरपूर : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, ही मनोज जरांगे पाटील यांची योग्य मागणी आहे. यासाठी त्यांनी आंदोलन पुकारले आहे. राज्य सरकारने यावर तोडगा काढण्यासाठी तातडीने विशेष अधिवेशन घ्यावे आणि त्यामध्ये आरक्षणावर सविस्तर चर्चा करावी, अशी मागणी माढ्याचे शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अभिजित पाटील यांनी केली आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न वेळीच सोडवला असता तर आज मराठा समाजावर सणासुदीच्या काळात आंदोलन करण्याची वेळ आली नसती अशी टीकाही केली.