अजित पवारांच्या 'त्या' आश्‍वासनाची करून दिली आमदार आवताडेंनी आठवण

अजित पवारांच्या 'त्या' आश्‍वासनाची करून दिली आमदार आवताडेंनी आठवण
अजित पवारांच्या 'त्या' आश्‍वासनाची करून दिली आमदार आवताडेंनी आठवण
अजित पवारांच्या 'त्या' आश्‍वासनाची करून दिली आमदार आवताडेंनी आठवणSakal
Updated on
Summary

आमदार समाधान आवताडे यांनी विधानसभेत आवाज उठवत प्रश्न उपस्थित केला.

मंगळवेढा (सोलापूर) : उत्पादित मालाला दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे कर्जबाजारी होण्याचे प्रमाण वाढत आहे. अशा परिस्थितीत महावितरणने (MSEDCL) शेतीपंपाची वीज जोडणी खंडित करण्याचा सपाटा लावला. यामुळे शेतकऱ्यांच्या भावना संतप्त झाल्या होत्या. त्यावर आमदार समाधान आवताडे (Samadhan Awtade) यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयावर मोर्चा मोर्चा काढून महावितरणच्या अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावण्यात आले होते. त्यानंतर देखील वीज तोडण्याचे सत्र सुरूच राहिले होते. त्याचे पडसाद आज आमदार समाधान आवताडे यांच्या माध्यमातून विधानसभेत (Legislative Assembly) उमटले. महावितरणने शेतकऱ्यांचा खंडित केलेला वीजपुरवठा व प्रलंबित महात्मा बसवेश्वरांच्या स्मारकाच्या प्रश्नावर आमदार समाधान आवताडे यांनी विधानसभेत आवाज उठवत प्रश्न उपस्थित केला. (MLA Avtade made aware of the assurance given by Ajit Pawar)

अजित पवारांच्या 'त्या' आश्‍वासनाची करून दिली आमदार आवताडेंनी आठवण
सोलापुर : कार व मोटार सायकल अपघातात एकाचा मृत्यु ; तिघे जखमी

गेल्या वर्षभरापासून हवामानातील बदलामुळे (Climate Change) शेतीतील उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली त्यातच कोरोनामुळे (Covid-19) शेती उत्पादनांची मागणी घटली. शेतकऱ्यांचे जगण्याचे साधन असलेला शेती व्यवसायच धोक्‍यात आला. उत्पादित मालाला दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे कर्जबाजारी होण्याचे प्रमाण वाढत आहे. अशा परिस्थितीत महावितरणने शेतीपंपाची वीज जोडणी खंडित करण्याचा सपाटा लावला. यामुळे शेतकऱ्यांच्या भावना संतप्त झाल्या होत्या. त्यावर आमदार समाधान आवताडे यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयावर मोर्चा मोर्चा काढून महावितरणच्या अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावण्यात आले होते. त्यानंतर देखील वीज तोडण्याचे सत्र सुरूच राहिले होते. त्याचे पडसाद आज आमदार समाधान आवताडे यांच्या माध्यमातून विधानसभेत उमटले.

अजित पवारांच्या 'त्या' आश्‍वासनाची करून दिली आमदार आवताडेंनी आठवण
मोहोळ : कोरोना मृतांच्या वारसासाठी तीन दिवशीय मदत शिबीराचे आयोजन

मतदारसंघात औद्योगिक वसाहत (MIDC) करण्याबाबतचा देखील प्रश्न आमदार आवताडे यांनी उपस्थित करून तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी मतदारसंघात औद्योगिक वसाहतीचा प्रश्न गेले कित्येक वर्षापासून प्रलंबित असल्याचे सांगत, मंगळवेढ्यातील (Mangalwedha) प्रलंबित महात्मा बसवेश्वरांच्या (Mahatma Basaveshwar) स्मारकाचाही त्यांनी प्रश्‍न उपस्थित केला. आवश्‍यक तितक्‍या स्वरूपात निधी देण्याचे आश्‍वासन अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिले होते; मात्र गेले नऊ महिने यामध्ये कोणत्याही प्रकारची प्रगती झाली नाही. महात्मा बसवेश्‍वर स्मारकाचा प्रश्न मार्गी न लागल्यामुळे निवडणुकीदरम्यान मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला मतदारांनी दिला होता. त्याच पार्श्वभूमीवर आज आमदार समाधान आवताडे यांनी विधानसभेत प्रश्‍न उपस्थित करून या आश्वासनांबाबत महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi Government) जाणीव करून दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com