पंढरपूर : पंढरपूर, सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यातील कथित सामाजिक वनीकरण विभागातील (Department of Social Forestry) 109 कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी गुन्हे दाखल असलेल्या आठ वन अधिकारी व कर्मचाऱ्यांना अटक करुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी सांगोल्याचे आमदार डाॅ. बाबासाहेब देशमुख (MLA Dr. Babasaheb Deshmukh) व तक्रारदार दादासाहेब चव्हाण यांनी केली आहे.