
उ. सोलापूर: उत्तर व दक्षिण सोलापूर तालुक्यातील सीना नदीवरील बंधाऱ्यांच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली आहे. एकूण सहा बंधाऱ्यांची दुरुस्ती होणार असून यासाठी चार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. येणाऱ्या उन्हाळ्यात या बंधाऱ्यात पाणी अडवले जाईल, या दृष्टीने प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहे. मात्र कामाची गुणवत्ता राखण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.