MLA Devendra Kothe raising key demands related to education and law enforcement during the legislative session.
Sakal
सोलापूर
Devendra Kothe: सोलापुरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय हवे; आमदार देवेंद्र कोठेंनी अधिवेशनात वेधले लक्ष..
Maharashtra Assembly winter session Solapur issues: सोलापुरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, उड्डाणपूल व चाळी पुनर्विकासाच्या मागण्यांवर आमदार कोठेंची अधिवेशनात ठाम भूमिका
सोलापूर : शहरातील १४ मोठ्या चाळींच्या पुनर्विकासासाठी ‘बी-टू’ची अट रद्द करावी. दहा वर्षांपूर्वी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंजूर केलेले सोलापुरातील दोन्ही उड्डाणपुलांचे काम भूसंपादन होऊन तातडीने सुरु व्हावे. तसेच सोलापुरातील नियोजित शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय देखील आगामी शैक्षणिक वर्षापासून सुरु व्हावे, अशा प्रमुख मागण्यांवर आमदार देवेंद्र कोठे यांनी नागपूरच्या अधिवेशनात सर्वांचे लक्ष वेधले.

