
- दत्तात्रय खंडागळे
सांगोला : आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांसाठी सांगोल्याचे शेकापचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख आणि त्यांची पत्नी डॉ. निकिता देशमुख हे दाम्पत्य चार आणि पाच जुलै रोजी वैद्यकीय सेवा देणार आहेत. शासनाच्या वैद्यकीय कक्षामार्फत हे दोघेही पती-पत्नी स्वतः उपस्थित राहून सेवा देणार असल्याची माहिती आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी दिली.