Gopichand Padalkar : माढा तालुक्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी आणि जनावरांसाठी चारा घेऊन आलेल्या आमदार गोपीचंद पडळकर यांनी, संवेदनशील मुख्यमंत्री लवकरच भरीव मदत देण्याचा चांगला निर्णय घेतील, असा आशावाद व्यक्त केला.
माढा : राज्याचे मुख्यमंत्री पूरग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याचा खुप चांगला निर्णय मुख्यमंत्री येत्या काही दिवसांत घेतील असा आशावाद आमदार गोपीचंद पडळकर यांनी माढयात पत्रकारांशी बोलताना शनिवारी (ता. ४) व्यक्त केला.