

Major Political Twist in Pandharpur as MLA Patil Controls Both NCP Camps
Sakal
-भारत नागणे
पंढरपूर: सोलापूर जिल्ह्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर पंढरपूर तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पंढरपूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार निवडीचे आणि एबी फार्म वाटप करण्याचे सर्व अधिकार माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांच्याकडे आल्याने राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे व युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळे, भोसेचे सरपंच गणेश पाटील यांची ऐनवेळी राजकीय कोंडी झाली आहे. राजकीय पर्याय म्हणून काळे बंधू भाजप जवळ करतील? अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान उद्या दुपारपर्यंत कल्याणराव काळे आणि गणेश पाटील आपली राजकीय भूमिका स्पष्ट करतील, अशी माहिती पुढे आली आहे.