मंत्रिपदाच्या शर्यतीतून आमदार प्रणिती बाहेर? कार्याध्यक्ष, प्रदेश प्रवक्‍तेपदावरच बोळवण | Political | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रणिती शिंदे
मंत्रिपदाच्या शर्यतीतून आमदार प्रणिती शिंदे बाहेर? कार्याध्यक्ष, प्रदेश प्रवक्‍तेपदावरच बोळवण

मंत्रिपदाच्या शर्यतीतून आमदार प्रणिती शिंदे बाहेर?

सोलापूर : कॉंग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांची कन्या असतानाही आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. मोदी लाटेतही त्यांनी विरोधकांना पराभवाची चव चाखायला लावली. सलग तीनवेळा आमदार झाल्यानंतर पक्षाची ताकद वाढविण्याच्या दृष्टीने पक्षाकडून मंत्रिपद मिळेल, असा विश्‍वास कार्यकर्त्यांना होता. मात्र, सुरुवातीला कार्याध्यक्षा आणि आता प्रदेश प्रवक्‍तेपद दिल्याने त्यांची मंत्रिपदाची आशा मावळल्याची चर्चा आहे. (MLA Praniti Shinde has dropped out of the race for the ministry post)

हेही वाचा: डिजिटल आर्थिक फसवणूक टाळायची आहे! बाळगा 'अशी' सावधगिरी!

आमदार प्रणिती शिंदे यांनी जाई-जुई विचार मंचच्या (Jai-Jui Vichar Manch) माध्यमातून सामाजिक कार्याला सुरुवात केली. सर्वसामान्य कुटुंबातील महिला, महाविद्यालयीन तरुण-तरुणींमध्ये त्यांची क्रेझ होती. 'सर्वसामान्यांचा आवाज' म्हणून त्यांची ओळख झाली. 2009 च्या विधानसभा निवडणुकीतच त्यांनी थेट मुंबईचे (Mumbai) विधानभवन (Vidhan Bhavan) गाठले. माकपचे (MCP) माजी आमदार नरसय्या आडम (Narsayya Adam), शिवसेनेच्या (Shiv Sena) उमेदवारासह 11 जणांना टक्‍कर दिली. त्याचवेळी त्यांनी महापालिकेवरील सत्ताही टिकवून ठेवली. 2014 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मोदी (Narendra Modi) लाटेत अनेक मातब्बरांना घरी बसावे लागले.

अशा कठीण प्रसंगात प्रणितींसमोर प्रथमच 'एमआयएम'चा (MIM) उमेदवार उभारला. तरीही, त्यांनी एमआयएम, शिवसेना, भाजप (BJP), माकप, राष्ट्रवादीसह (NCP) तब्बल 26 उमेदवारांचा पराभव करून पुन्हा एकदा आमदारकी मिळविली. राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार असल्याने त्यांना मतदारसंघातच काम करावे लागले. दुसरीकडे महापालिकेवरील कॉंग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता गेली. अशा परिस्थितीतही त्यांनी 2019 च्या निवडणुकीत विजयाची हॅट्ट्रिक साधली. त्यावेळी त्यांनी एमआयएम, शिवसेना, अपक्ष उमेदवार महेश कोठे (Mahesh Kothe) यांच्यासह 20 उमेदवारांचा पराभव केला. महाविकास आघाडी सरकारमध्ये (Mahavikas Aghadi Government) पहिल्या टप्प्यात मंत्रिपदाने हुलकावणी दिल्याने अडीच वर्षांनंतर मंत्रिपद मिळेल, अशी कार्यकर्त्यांना आशा होती. मात्र, पक्षाने त्यांना पहिल्यांदा प्रदेश कार्याध्यक्षा आणि आता प्रवक्‍तेपद देऊन मंत्रिपदाच्या चर्चेला पूर्णविराम दिल्याचेही बोलले जात आहे.

हेही वाचा: कर्ज देणारे 'हे' App इन्स्टॉल किंवा लिंक ओपन कराल तर बसेल फटका

प्रदेशावर काम, मग जिल्ह्याचे काय?

भाजपने आमदार विजयकुमार देशमुख (Vijaykumar Deshmukh), आमदार सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) यांना मंत्रिपदे देऊन पक्षसंघटन मजबूत करण्याचा प्रयत्न केला. पक्षाचा विश्‍वास साध्य करून त्यांनी जिल्ह्यात भाजप आमदारांची संख्या आतापर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक केली. त्याच धर्तीवर आमदार प्रणितींना मंत्रिपद देऊन जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह लोकसभा (Loksabha), विधानसभा (Vidhansabha) मतदारसंघात ताकद वाढविण्याचा प्रयत्न कॉंग्रेसकडून होईल, अशी आशा होती. मात्र, शहरातील नगरसेवक, माजी पदाधिकारी पक्ष सोडून जात असतानाच आणि दुसरीकडे ग्रामीणमध्ये कॉंग्रेस स्वत:च्या अस्तित्वासाठी झगडत असतानाच आमदार प्रणितींना 'प्रदेश'वर संधी देण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात कोण लक्ष देणार, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

Web Title: Mla Praniti Shinde Has Dropped Out Of The Race For The Ministry Post

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top