
सोलापूर : महाराष्ट्रातील जनतेच्या मनात शिवसेनेचे कायमच आकर्षण राहिले आहे. सत्तेत असताना मनोहर जोशींसारख्या मुख्यमंत्र्यांच्या काळात दिल्लीच्याही तख्ताला झुकावे लागले होते. त्यामुळे आगामी काळात महापालिका निवडणुकीत सत्ता काबीज करण्यासाठी बेभान होऊन शिवसैनिकांनी काम करावे, असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामी यांनी केले.