वैराग ते धामणगाव रोडवरील नागझरी नदीवर नवीन पुलासाठी निधी मंजूर : आमदार राऊत

MLA Rajendra Raut informed that funds have been sanctioned for the bridge over Nagzari river on Vairag-Dhamangaon road :
MLA Rajendra Raut informed that funds have been sanctioned for the bridge over Nagzari river on Vairag-Dhamangaon road :

वैराग (सोलापूर) : वैराग ते धामणगाव रस्त्यावरील नागझरी नदीवर नवीन पुल बांधण्यासाठी 3 कोटी 76 लाख 11 हजार रूपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार राजेंद्र राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

वैराग - धामणगाव या मार्गावरून काटी, सावरगाव मार्गे मराठवाड्याला जोडला जाणारा जवळचा मार्ग आहे. शेळगाव (आर) ला जाणारा जवळचा मार्ग म्हणून शेतकरी वाहतूक जास्त होते. या मार्गावर नागझरी नदीवर कोल्हापूर पध्दतीचा बंधारा पूल बांधलेला आहे. मात्र हा पूल गतवर्षी झालेल्या अतिवृष्टी पावसात वाहून पुलाचे व परिसरातील शेतीचे मोठे नुकसान झाले होते. शिवाय हा पूल धोकादायक बनला असून या पुलावरून जीव धोक्यात घालून जा-ये होते. सध्याच्या पुलाची उंची, रुंदी कमी असून पुराचे पाणी गाळे लहान असल्याने पाण्याच्या फुगवट्यांमुळे आजुबाजूची शेती, पिके पाण्याने वाहून जात होती. या भागातील शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी नवीन पुलाचा प्रस्ताव तयार करून त्यास मंजुरी घेतली असल्याचे आमदारांनी सांगितले. 

नागझरी नदीवरील नवीन पूल मंजूर झाल्याने वैराग, धामणगाव व परिसरातील गावांना फायदा होणार आहे. प्रवाशांचा चांगल्या रस्त्यामुळे कमी वेळ व खर्च वाचेल. प्रवाशी वर्ग जवळचा मार्ग म्हणून या मार्गाने मोठी वाहतूक वाढेल, असे सरपंच शिवाजी पाटील यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com