esakal | आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील कोरोना पॉझिटिव्ह ! संपर्कातील सहकाऱ्यांना केले टेस्ट करून घेण्याचे आवाहन
sakal

बोलून बातमी शोधा

Ranjitsinh

पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे यांच्यासाठी अहोरात्र काम करत असलेले आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीत रणजितसिंहांना प्रचारापासून दूर राहून क्वारंटाईन राहावे लागणार आहे. 

आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील कोरोना पॉझिटिव्ह ! संपर्कातील सहकाऱ्यांना केले टेस्ट करून घेण्याचे आवाहन

sakal_logo
By
अभय जोशी

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे यांच्यासाठी अहोरात्र काम करत असलेले आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीत रणजितसिंहांना प्रचारापासून दूर राहून क्वारंटाईन राहावे लागणार आहे. 

पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात आमदार प्रशांत परिचारक यांच्या बरोबरीने आमदार रणजितसिंह मोहिते - पाटील भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारात सक्रिय झाले होते. गेल्या काही दिवसांपासून कोणत्याही परिस्थितीत समाधान आवताडे यांना विजयी करायचेच, या जिद्दीने परिचारक आणि मोहिते- पाटील या जोडीने गावागावात जाऊन प्रचाराला वेग दिला होता. सिद्धेश्वर आवताडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते - पाटील यांच्या समवेत त्यांनी सिद्धेश्वर आवताडे यांच्या सोबत बैठक घेतली होती. त्यामध्ये मार्ग न निघाल्याने रणजितसिंहांनी पुन्हा दुसऱ्या दिवशी सलग चार तास सिद्धेश्वर आवताडे यांच्याशी बोलून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला होता. 

दरम्यान, काल मंगळवारी देखील दिवसभर आमदार रणजितसिंह हे प्रचार कार्यात सहभागी होते. पंढरपूर, मंगळवेढ्यातील प्रचार सभा तसेच पंढरपूर येथील व्यापारी महासंघाच्या बैठकीत देखील त्यांनी आमदार प्रशांत परिचारक, भाजपचे उमेदवार समाधान आवताडे, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या समवेत व्यापाऱ्यांसोबत संवाद साधला होता. दरम्यान, त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने त्यांनी तपासणी केली तेव्हा त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांनी तातडीने स्वतःला क्वारंटाईन करून घेतले असून, संपर्कात आलेल्या सर्वांना त्यांनी कोरोना टेस्ट करून घेऊन काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल