तुम्ही काय दादा लागून गेलात का? त्या नादाला लागू नका - आ. समाधान आवताडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mla samadhan autade
तुम्ही काय दादा लागून गेलात का? त्या नादाला लागू नका - आ. समाधान आवताडे

तुम्ही काय दादा लागून गेलात का? त्या नादाला लागू नका - आ. समाधान आवताडे

मंगळवेढा - मी एक तर बोलत नाही, बोललो तर त्याला सोडत नाय, बघतो करतो अशी उत्तर देता, तुम्ही काय दादा लागून गेलात का? असा सवाल करत तुम्ही त्या नादाला लागू नका. असा प्रश्न महावितरणच्या मनमानी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना आ. समाधान आवताडे यांनी केला.

तालुक्यातील गावभेट दौऱ्याच्या निमित्ताने त्यांनी आज हिवरगाव, खोमनाळ, भाळवणी, जालीहाळ, हाजापूर,रेड्डे, शिरनांदगी, मारोळी, पडोळकरवाडी, महमदाबाद हु, लोणार आदी गावांचा दौर्‍यात हाजापूर येथे बोलत होते. जालीहाळ येथे शेतकऱ्यांच्या मागणीनुसार स्व-खर्चाने डी.पी. ची उभारणी केली. परंतु, कडक उन्हाळ्यात पाण्यासाठी लाही-लाही होत असताना महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी डी.पी. सुरू करण्यास चालढकल केल्यामुळे येथील शेतकरी दिगंबर माने यांनी आ. आवताडे यांच्या कानावर हा प्रकार घातला. त्यावेळी महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची चालढकल करण्याची भूमिका लक्षात आले. आ. आवताडे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना आज खडे बोल सुनावले. तत्पूर्वी त्यांच्या दौऱ्यात हिवरगाव, खोमनाळ, जालीहाळ, शिरनांदगी, भाळवणी येथे देखील महावितरणच्या निंबोणी शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची मनमानी समोर आली. भाळवणी येथे चार ठिकाणी अतिरिक्त डि.पी गरज असताना गेल्या काही वर्षापासून सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले. तर इंदिरानगर येथील धोकादायक वीज पुरवठा पर्यायी मार्गाने करण्याचे निवेदन देऊन देखील महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या प्रकाराकडे दुर्लक्ष करून, येथील नागरिकांचा जीव धोक्यात आणून ठेवला. वसंत गायकवाड यांनी तीन पोल उभा करून काम अर्धवट ठेवत विजजोड देण्यास टाळाटाळ करत असल्याची तक्रार केली. भास्कर पाटील यांनी डी. पी. ची उभारणी करून काम पूर्ण केले नसल्याची तक्रार केली.

शिरनांदगी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीजचोरी नावाखाली घरगुती वीज ग्राहकांना त्रास दिला. व घरगुती साहित्य चुकीच्या पद्धतीने कारवाई करत नेल्याची तक्रार यावेळी करण्यात आली. आजच्या या दौर्‍यात महावितरणच्या कर्मचारी महावितरण अधिक तक्रारी दिसून आल्यामुळे आ. आवताडे यांनी याबाबत विचारणा केली. महावितरणच्या कर्मचाऱ्याकडून अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने आ. आवताडे अखेर संतप्त होऊन त्यांना खडे बोल सुनावले. व याबाबत मी आतापर्यंत असे बोललो नाही. मात्र, तुम्ही बोलायची वेळ आणून ठेवली आहे. या पुढील काळात असे चालणार नाही, असा इशारा देखील दिला. त्यामुळे आजच्या एकूणच त्यांचा महावितरणच्या कर्मचाऱ्यांची मनमानी समोर आली. पावसाळ्याच्या तोंडावर वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता असून, बहुतांश महावितरणचे अधिकारी कर्मचारी शेतकऱ्याचे फोन उचलण्यास टाळाटाळ करीत असल्यामुळे किमान पावसाळ्याच्या दिवसात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयात राहण्याची सक्ती करावी अशी मागणी या निमित्ताने पुढे येऊ लागली.

Web Title: Mla Samadhan Autade Talking To Mahavitran Officer And Employee

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top