Solapur : आमदार शहाजी पाटील यांच्या 'त्या' वक्तव्याने जिल्ह्यातील राजकारण ढवळले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Shahaji Patil | ajit pawer

Solapur : आमदार शहाजी पाटील यांच्या 'त्या' वक्तव्याने जिल्ह्यातील राजकारण ढवळले

सोलापूर : 'समंदं काही ओके' या स्लोगनवरून देशभरात चर्चेत आलेल्या सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांच्या राष्ट्रवादीचे बारा आमदार फुटणार या वक्तव्यावरून सोलापूर जिल्ह्यात खळबळ माजली असून राष्ट्रवादीमधील नेमके कोणते नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या तंबूत जाणार याबद्दल तर्कवितरकांना अक्षरशः उधाण आले आहे.

दरम्यान दूसरीकडे कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादीचे आमदार फुटणार नाहीत, याचा सावध पवित्रा घेत राजकीय परिस्थितीवर डोळ्यातील घालून राहत असलेले महाराष्ट्राच्या विधानसभेतील विरोधी पक्ष नेते आणि राष्ट्रवादीमधील मुलुख मैदानी तोफ अजित पवार यांनी सोलापुरातील त्यांच्या अत्यंत विश्वासू काही नेत्यांना फोन करून सोलापूर जिल्ह्यातील माहिती गुप्तपणे काढण्यास सांगितली आहे. सोलापूरातील राष्ट्रवादीच्या अत्यंत गोपनीय सूत्रांकडून ही माहिती हाती लागली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे भरपूर घडामोडी घडत असल्याची शक्यता आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे नेते आमदार शहाजी पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रसचे तब्बल १२ नेते फुटणार असल्याचे संकेत दिले आहेत. “या सर्व नेत्यांचा पक्षप्रवेशाचा मुहूर्त अद्याप ठरलेला नाही.

पण हे १२ नेते फुटणार असल्याचं निश्चित झालंय. यामध्ये सोलापूरच्या बड्या नेत्याचा समावेश आहे, असा धक्कादायक दावा शहाजीबापू पाटील यांनी केलाय. त्यांचा हा दावा कितपत खराय, ते आगामी काळात समजेलच. पण दुसरीकडे शिर्डी सुरु असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन शिबिरात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपले पदधिकारी आणि कार्यकर्त्यांना या संबंधित महत्त्वाचा आणि मोलाचा सल्ला दिला आहे.

अजित पवार यांनी आपल्या पक्षातील नेत्यांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. ते आपल्या पक्षातील लोकांना पण आमिष दाखवत आहेत. आपल्या लोकांनाही काही सांगत आहेत. पण त्यांच्या आश्वासनाला बळी पडू नका असं आवाहन अजित पवार यांनी केलं. जे पक्ष सोडून गेले त्यांना आता पश्चाताप होतोय. त्यांना वाटतं जे केलं ती चूक झाली.

ज्या घरात वाढलो ते घर उद्ध्वस्त करणं योग्य नाही. शिवसेनाबाबत जे घडलं, त्याने नाव गेलं, हे महाराष्ट्रातील जनतेला आवडले नाही असं अजित पवार आपल्या पक्षातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले आहेत.

महाराष्ट्रातील राष्ट्रवादीमध्ये मोठा राजकीय भूकंप होऊ शकतो, असा सांगोल्याच्या आमदार यांचा आहे. संगीता सोलापूर जिल्ह्यातील कोणते राष्ट्रवादीचे नेते असंतुष्ट आहेत त्यांची माहिती काढली जात आहे. जेणेकरून त्यांची मन भरणी करून ते राष्ट्रवादी पक्षातच राहण्यासंदर्भात काही करता येईल का हे पडताळून पाहिलं जात आहे.

सोलापूरचे माजी उपमहापौर आणि राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेते, शरद पवारांचे अत्यंत विश्वासू आणि जुने सहकारी दिलीप कोल्हे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या वळचणीला गेले आहेत, याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील महिलांची मोठी फौज शिंदे गटात ढेरे दाखल झाली आहे, या सगळ्या घडामोडी पाहता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही बडे नेते शिंदे गटात जाऊ शकतात हे अनुमान लावत,

आमदार शहाजी पाटील यांनी केलेला दावा लक्षात घेत, सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची घडी अजिबात विस्कटू नये ,या पक्षातले कोणीच बडे वा छोटे नेते शिंदे गटात जाणार नाहीत, याची दक्षता घेऊन तशा हालचाली बारामती येथून होत असल्याची विश्वसनीय माहिती मिळत आहे.