
सोलापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी मंगळवारपासून (ता. २५) अर्ज स्वीकारले जाणार आहेत. २७ एप्रिलला मतदान आणि २८ एप्रिलला मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापूर तालुक्यातील नेते समीकरणांची जुळवाजुळव करू लागले आहेत. शनिवारी बैठक घेऊन आमदार सुभाष देशमुख यांनी बाजार समितीच्या निवडणुकीसाठी स्वतंत्र पॅनेल उभारण्याचा निर्णय जाहीर केला आहे.