राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली 'मारकडवाडी'मधून लाँग मार्च; ईव्हीएम विरोधातील आक्रोशाची चिंगारी पेटली

Rahul Gandhi long March : माळशिरस तालुक्यातील मारकडवाडीत (Markadwadi Malshiras) ईव्हीएम (EVM) विरोधातील आक्रोशाची चिंगारी पेटली आहे.
Rahul Gandhi long March
Rahul Gandhi long Marchesakal
Updated on
Summary

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे रविवारी (ता. ८) सकाळी १० वाजता मारकडवाडी (ता. माळशिरस) येथील ग्रामस्थांच्या भेटीला येणार आहेत.

सोलापूर : माळशिरस तालुक्यातील मारकडवाडीत (Markadwadi Malshiras) ईव्हीएम (EVM) विरोधातील आक्रोशाची चिंगारी पेटली आहे. ही चिंगारी संपूर्ण देशभर पेटण्याअगोदर निवडणूक आयोगाने (Election Commission) राज्यात तातडीने पुनर्मतदानाचा आदेश काढावा. निवडणूक आयोगाने आदेश काढला नाही, तर आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार आहोत आणि त्यातूनही काही नाही झालं तर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी मारकडवाडीमधून लॉंग मार्च काढणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com