

Opposition Alleges Political Vendetta in MNS Functionary’s Killing
sakal
सोलापूर: पोलिस व महापालिका प्रशासन भाजपच्या दबावाखाली काम करत आहे. भाजपच्या सत्तेच्या लालसेपोटी लोकांचा बळी जात आहे. बिनविरोध निवडणूक होण्यासाठी असे प्रकार होत असून राजकीय हेतूनेच मनसे पदाधिकाऱ्याचा खून करण्यात आला आहे. सोलापूर व महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासण्याचे काम या लोकांनी केले असल्याचा आरोप खासदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी रविवार (ता. ४) सकाळी १० ते १२ या वेळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर शांततेत आंदोलन करणार असल्याचे खासदार शिंदे यांनी सांगितले.