

Mohol Police Recover Stolen Goods Worth ₹1.05 Lakh"
Sakal
मोहोळ : गेल्या महिन्यात मोहोळ शहरातील मुख्य रस्त्यावरील दोन मोबाईल शॉपी फोडून चोरी करणारा संशयित, मोहोळ पोलिसांच्या जाळ्यात सापडला असून, त्याच्या कडून पोलिसांना एक लाख पाच हजाराचा ऐवज हस्तगत करण्यात यश आले आहे. शितल शामराव कोळके रा नांदणी ता शिरोळ जिल्हा कोल्हापूर असे संशयताचे नाव आहे. ही चोरी उघड झाल्याने शहरातील व्यापाऱ्या मधून समाधान व्यक्त होत आहे.