मोदी सरकार देश भांडवलदारांच्या ताब्यात देत आहे : डॉ.धवलसिंह मोहिते

वेळोवेळी पोकळ आश्वासन देऊन देशातील लोकांची फसवणूक केलेल्या असंवेदनशील मोदी
dhavalsinh mohite
dhavalsinh mohiteSakal

सोलापूर : काँग्रेसच्या कार्यकालातील सर्व उद्योग व्यवसाय व कंपन्या विकण्याचा सपाटाच मोदी सरकारने लावला असून देश भांडवलदारांच्या ताब्यात देण्याचे हे विनाशकारी धोरण असून देशाला न परवडणारे असुन न भूतो न भविष्यती असे निर्णय घेतले जात आहेत. शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये देणारे मोदी सरकार वास्तवात मात्र शेतकऱ्यांच्या खिशातून वर्षाला लाख ते दीड लाख रुपये कळत नकळत काढून घेत आहे. वेळोवेळी पोकळ आश्वासन देऊन देशातील लोकांची फसवणूक केलेल्या असंवेदनशील मोदी सरकारला पर्याय म्हणून काँग्रेस शिवाय दुसरा पर्यायच नाही, असे मत डॉ धवलसिंह मोहिते-पाटील यांनी व्यक्त केले.निमगाव (ता.माळशिरस) येथे आयोजित काँग्रेस कार्यकर्ता व जनसंपर्क दौऱ्या प्रसंगी ते बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की, पेट्रोल डिझेलचे दररोज वाढणारे भाव खाद्य तेल,स्वयंपाकाचा गॅस यांच्या वाढलेल्या किंमतीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून दरवर्षी दोन कोटी रोजगार उपलब्ध करून देण्याचे खोटे आश्वासन देणाऱ्या मोदी सरकारने दरवर्षी चार कोटी पेक्षा जास्त लोकांना बेरोजगार केले असून वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे जिने मुश्किल झाले आहे.

dhavalsinh mohite
कऱ्हाडातही कॉंग्रेसला सत्ता द्या; पृथ्वीराज चव्हाणांचं आवाहन

यावेळी व्यासपीठावर माजी आमदार रामहरी रुपनवर,ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष वसीम पठाण ,महाराष्ट्र केसरी रावसाहेब मगर, गणेश बिडवे, भीमराव बाळगी, दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे माजी सभापती शिवयोगी बिराजदार ,जनसेवेचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव मिसाळ, अण्णासाहेब शिंदे, अण्णासाहेब इनामदार, सतीश पालकर ,शिवाजीराव इंगवले देशमुख, कुसमोड उपसरपंच रणजीत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निमगाव ग्रामपंचायतीचे सदस्य बापूराव मगर, सत्यवान मगर ,जयसिंग मोरे, दत्तात्रय मगर, नंदकुमार मगर, बाळासाहेब मगर ,विश्वनाथ मगर आदींनी विशेष परिश्रम घेतले.प्रास्ताविक निनाद पाटील यांनी तर सूत्रसंचालन व आभार शिवम कांबळे यांनी मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com