Modnimb Fire News: मोडनिंब येथे भीषण अग्नितांडव! ‘जलजीवन’चे पाइप खाक, मंदिर अन् ग्रामपंचायतीचे ३२ लाखांचे नुकसान

Massive Fire In Modnimb Causes 32 Lakh Loss: जलजीवन मिशनचे पाइप आणि मंदिराचे साहित्य जळाले
Modnimb Fire News Jal Jeevan Mission Pipes Burned Temple And Gram Panchayat Suffer 32 Lakh Property Loss

Modnimb Fire News Jal Jeevan Mission Pipes Burned Temple And Gram Panchayat Suffer 32 Lakh Property Loss

sakal

Updated on: 

मोडनिंब: येथील दत्तनगर परिसरातील गणपती मंदिराशेजारी लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राबविण्यात येत असलेल्या जलजीवन मिशनच्या पाइप या आगीत जळून भस्मसात झाल्या. लगतच्या गणपती मंदिराचेही मोठे नुकसान झाले असून, गाभाऱ्यासह सभामंडप जळून खाक झाला. दुपारी चारच्या सुमारास लागलेली आग सर्व साहित्य जळून राख झाल्यानंतरच शांत झाली. अग्निशमन दलाच्या गाड्या उशिरा घटनास्थळी पोहोचल्याचे नागरिकांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com