
-राजकुमार शहा
मोहोळ : कोरोना काळा पासून मोहोळ रेल्वे स्थानकात न थांबणारी "सिद्धेश्वर एक्सप्रेस" अखेर बुधवार ता 3 सप्टेंबर रोजी तब्बल पाच वर्षांनी रात्री 11 वाजता मोहोळ स्थानकात पुन्हा थांबताच प्रवासी व अन्य नागरिकांनी जल्लोष केला पेढे, भरवुन फटाके फोडुन आनंद व्यक्त केला. एक्सप्रेसचे चालक एस डी जाधव,सहाय्यक चालक अभिषेक यादव व स्टेशन मास्तर विनोद सिरसट यांचा उपस्थित नागरिकांनी पुष्पहार घालून सत्कार केला, व गाडी पुढे मार्गस्थ झाली.