Mohol Crime : गायीचे मांस निर्यात करणे व कत्तलीसाठी जनावरे डांबुन ठेवल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

गायीचे मांस निर्यात करणे व कत्तलीसाठी जनावरे डांबुन ठेवल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल
Crime
Crimesakal

मोहोळ - गाय कापुन त्यांचे मांस निर्यात करणे तसेच स्वतःच्या गोठ्यात कत्तलीसाठी व त्यांच्या चाऱ्या पाण्याची सोय न करता लहान-मोठी 30 हजार रुपये किमतीची जनावरे डांबून ठेवल्या प्रकरणी एका इसमावर मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार पाटकुल ता मोहोळ येथे शनिवारी दुपारी चार वाजता घडला. रामचंद्र तुकाराम लोंढे असे गुन्हा दाखल झालेल्या चे नाव आहे.

मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, मोहोळ पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल आनंदराव सुरेश डौले यांची शनिवार ता 8 रोजी 'डायल 112' या विभागात नेमणूक करण्यात आली होती. सायंकाळी चार वाजता डौले यांना एमडीटी वर कॉल प्राप्त झाला की, पाटकुल येथील रामचंद्र तुकाराम लोंढे याच्या जमीन गट नंबर 84/4 मध्ये गायी ची हत्या सुरू आहे त्या ठिकाणी गाय कापने सुरू आहे, मदत पाहिजे.

अशा प्रकारचा कॉल प्राप्त होताच, मोहोळ पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल थोरात पोलीस कॉन्स्टेबल जमादार व अन्य सहकारी घटना स्थळावर गेले. त्या ठिकाणी पाच ते सहा लोक जमलेले दिसले. त्यांच्या कडे चौकशी केली असता रामचंद्र तुकाराम लोंढे याचा तो गोठा असून, सदरचा इसम हा रात्रीच्या वेळी गाय कापून त्यांचे मांस गाडीतून निर्यात करत असल्याचे सांगितले. तो पळून गेल्याचेही त्या लोकांनी सांगितले.

गोठ्याची पाहणी केली असता गोठ्यात सहा लहान मोठी 30 हजार रुपये किमतीची जनावरे त्यांच्या चारा पाण्याची कुठलीही व्यवस्था न करता कत्तलीसाठी डांबून ठेवल्याचे निदर्शनास आले. ही माहिती वरिष्ठांना कळविल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक हेगडकर, पोलीस उपनिरीक्षक लोबो चव्हाण हे घटना स्थळावर आले. त्यांनी पाहणी केली व जनावरे जप्त करून गोशाळे त पाठविली. या प्रकरणी रामचंद्र तुकाराम लोंढे याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक लोबो चव्हाण करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com