
मोहोळ : मोहोळ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी व वैभवात भर घालण्याच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषद प्रशासनाने सादर केलेल्या तीन हजार कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास मंजुरी मिळाली आहे. त्यात एकूण ३२ आरक्षण पडल्याची माहिती नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ. योगेश डोके यांनी दिली.