
मोहोळ : जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर अाणि उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या संकल्पनेतून ‘हरित वारी’ या उपक्रमांतर्गत मोहोळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी सर्व पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसमवेत मोहोळ- पंढरपूर- आळंदी या पालखीमार्गावर मोहोळ शहरा नजीकच्या चंद्रमौळी गणेश मंदिर परिसरात विविध देशी वृक्षांची लागवड करून हरित वारी उपक्रमात आपला सहभाग नोंदवला.