Mohol News : वर्गणीतून शासनाचे विज बिल भरले; तहसीलदार सचिन मुळीक यांचा नवीन पायंडा

मोहोळ येथील मुलींच्या शासकीय वस्तीगृहाचे कोविड काळातील थकीत वीज बिल महसूल कर्मचाऱ्यांनी वर्गणी संकलित करून भरल्याने वस्तीगृहाचा ताबा देण्याचा मार्ग मोकळा झाला.
Tahsildar Sachin Mulik
Tahsildar Sachin Muliksakal
Updated on

मोहोळ - मोहोळ येथील मुलींच्या शासकीय वस्तीगृहाचे कोविड काळातील थकीत वीज बिल महसूल कर्मचाऱ्यांनी वर्गणी संकलित करून भरल्याने वस्तीगृहाचा ताबा देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे प्रत्येक महिन्याला लागणारे 40 हजार रुपये भाड्यात शासनाची मोठी बचत झाली आहे. नूतन तहसीलदार सचिन मुळीक यांनी जिल्ह्यात एक नवीन आदर्श निर्माण केला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, सध्याचे मुलींचे वस्तीगृह भाड्याच्या जागेत आहे. त्या जागेला महिन्याला 40 हजार रुपये भाडे आहे. दरम्यान शासनाने शहरा नजीक नवीन वस्तीगृह बांधले आहे. मात्र गेल्या दोन वर्षांपूर्वी कोरोनाच्या कार्यकालात रुग्णांवर उपचारासाठी या इमारतीचा कोविड सेंटर म्हणून वापर करण्यात आला. मात्र कोविडच्या कालावधीत मीटर रिडींग न घेता आल्याने या इमारतीचे 1 लाख 3 हजार 370 रुपये विज बिल थकले होते.

तत्कालीन नायब तहसीलदार भालचंद्र यादव यांनी चिंचोली औद्योगिक वसाहतीतील काही कंपन्यांना थकीत वीज बिल भरण्याबाबत आवाहन केले होते. त्यानुसार दोन कंपन्यांनी प्रत्येकी 25 हजारा प्रमाणे उत्तरदायित्व खंडातून 50 हजार रुपये बिल भरले.

उर्वरित 53 हजार 370 रुपये थकीत वीज बिल भरण्याचे राहिले होते. दरम्यान नूतन तहसीलदार सचिन मुळीक यांनी महसूल कर्मचाऱ्यांशी विचार विनिमय करून उर्वरित वीज बिल सर्वांनी वर्गणीच्या माध्यमातून संकलित करून भरले. त्यामुळे वार्षिक सुमारे 5 लाख रुपयांच्या शासनाच्या भाड्यात बचत झाली आहे.

यावेळी मंडल अधिकारी बिबीषन वागज, जुबेर नदाफ, श्री दळवे, कलावती कोटे, संदीप गायकवाड, सोमनाथ जाधव यांच्यासह चंद्रकांत मासाळ, अजिज आवटे उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.