Mohol News : मोहोळ तालुक्यातील 18 हजार हेक्टर क्षेत्र येणार ओलीता खाली; टप्पा क्रमांक तीनसाठी चाळीस कोटी रुपये मंजूर

माजी आमदार राजन पाटील यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे 'आष्टी उपसा सिंचन योजने'च्या कामासाठी 100 कोटी ची मागणी केली होती.
MLA Rajan Patil
MLA Rajan Patilsakal
Updated on

मोहोळ - मोहोळ तालुक्यातील दहा गावांच्या शेतकऱ्याच्या जीवनात हरितक्रांती घडविणाऱ्या 'आष्टी उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक तीन' या योजनेसाठी सोमवारी जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात 40 कोटी रुपयांची तरतूद केली असून या योजनेचा कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लवकरच करणार असल्याची माहिती मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनी दिली.

या संदर्भात माहिती देताना माजी आमदार पाटील म्हणाले, या योजनेचा प्रस्ताव दाखल करते वेळी अनगर व दहा गावे उपसा सिंचन योजना या नावाने दाखल केला होता, मात्र शासन दरबारी तपासणी करून याच योजनेचे आष्टी उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक तीन असे नामकरण करण्यात आले.

माजी आमदार पाटील यांनी 14 जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे या योजनेच्या कामासाठी 100 कोटी ची मागणी केली होती, तशा आशियाची लेखी पत्र ही दिले होते. त्याच मागणीचा विचार करून चालू अर्थसंकल्पात निधीची तरतूद केल्याची माहिती माजी आमदार पाटील यांनी दिली.

दरम्यान या योजने मुळे देवडी, वाफळे, खंडोबाची वाडी, नालबंदवाडी, कोंबडवाडी, कुरणवाडी, हिवरे, वडाचीवाडी, चिखली, व अनगर या गावातील शेतकऱ्यांचे 18 हजार हेक्टर क्षेत्र ओलिता खाली येणार आहे. त्यामुळे या परिसरातील शेतीचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा निकालात निघणार आहे.

निधी मंजूर झाल्याचे समजताच शेतकऱ्यांनि आनंदोत्सव साजरा केला. या योजनेसाठी निधी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व सर्व शासकीय अधिकाऱ्यांचे माजी आमदार पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रिया -

या योजनेचा सर्वे पुर्ण झाला आहे. आता लवकरच टेंडर प्रकीया होईल व प्रत्यक्ष कामाला सुरवात होणार आहे.

- राजन पाटील, माजी आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com