
-राजकुमार शहा
मोहोळ : सामाजिक व सहकार क्षेत्रातील मोहोळ येथील अभ्यासु व सामाजिक कार्यकर्ते डॉ कौशिक संदिपान गायकवाड यांना हिमाचल प्रशासनाचा अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा "क्रिएटर अँड बिझनेस एक्सलेन्स अवॉर्ड 2025" या पुरस्काराने सिमला येथे राज्यपाल शिवप्रताप शुक्ला यांच्या हस्ते शुक्रवार ता 14 रोजी सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारासाठी डॉ गायकवाड यांची जिल्ह्यातून एकमेव निवड करण्यात आली.