

Low Jowar Sowing in Mohol Taluka Amid Heavy Rains and Floods
Sakal
मोहोळ : चालू पावसाळ्यात मोहोळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. तर सीना नदीलाही मोठ्या प्रमाणात महापुर आला होता. त्यामुळे जमिनीचा पोत खराब झाला आहे. तर अद्यापही काही ठिकाणी वापसा नाही, तर जमिनीतून आजही पाणी वाहत आहे. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत. जमिनीची मशागत ही करता येईना तर वाफशा अभावी रब्बी हंगाम पुढे चालला आहे. पावसाळ्या पासून ते गेल्या आठवड्या पर्यंत ढगाळ हवामान होते, मात्र गेल्या आठवड्या पासून कडक थंडी पडू लागली आहे. ही थंडी गहू, हरभरा, कांदा या पिकांना अत्यंत पोषक आहे.