Bajirao Powar
sakal
मोहोळ - मोहोळ तालुक्यात ग्रामीण भागातील शेत रस्ते व बांधफोडी या तक्रारी मोठ्या प्रमाणात आहेत, तर अपघातांचे प्रमाण ही मोठे आहे. एका वर्षात 749 जणांचा अपघातात मृत्यू झाला या बाबी अतिशय गंभीर असून, यावर सर्व वरिष्ठांच्या व शहर वासीयांच्या मदतीने उपाययोजना करणार असल्याची माहिती मोहोळ पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी दिली.