

Pokharapur Theft Case in Mohol Gold Jewellery and Cash Worth 4.27 Lakh Stolen While Elderly Couple Sleeps Outside
esakal
मोहोळ: दरवाजाला बाहेरून कडी लावून पोर्चमध्ये वयोवृद्ध पती-पत्नी झोपले होते. याचा फायदा उचलत चोरट्यांनी घरात प्रवेश करत दोन बेडरूम मधील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 4 लाख 27 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. जाताना शेजारच्या वस्तीवरील शेतकऱ्याची दुचाकी ही पळवून नेल्याची घटना पोखरापूर ता मोहोळ येथे दि 3 नोव्हेंबर रोजी मध्ये रात्री घडली.