

Mohole Water Fodder and Electricity Issues Rise as Sitting and Former MLAs Trade Criticism Amid Drought Like Conditions
esakal
मोहोळ : तीव्र चाराटंचाई, पाणीटंचाई, विजेचा प्रश्न, पंढरपूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाला जोडलेला मोहोळ तालुका हे अत्यंत ज्वलंत प्रश्न मोहोळ तालुक्याच्या जनते पुढे असताना मोहोळचे आमदार राजू खरे व माजी आमदार यशवंत माने हे मात्र एकमेकांच्या उखाळ्या-पाखाळ्या काढण्यात गुंतले आहेत,एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी दोघेही जण सोडत नाहीत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांची मात्र करमणूक होत आहे,