वर्षानुवर्ष दारूच्या व्यसनाधीन असलेले ४० हुन अधिकजण व्यसनातुन मुक्त

व्यसनाधीनमुक्त होण्याची आदर्श संकल्पना उपळाई बुद्रुक येथील व्यसनाधीन असलेल्या नागरिकांनी सिद्ध करून दाखवल
 40 alcoholics free from addiction
40 alcoholics free from addiction sakal
Updated on

उपळाई बुद्रूक : दारूचे व्यसन सोडवण्यासाठी खरतर जगात कोणतेही औषध नाही. मात्र केवळ समुपदेशाने, मार्गदर्शनाने माणसाचे विचार बदलवल्याने दारूचे व्यसन सुटू शकते. हे उपळाई बुद्रुक (ता. माढा) येथील व्यसनाधीन असलेल्या नागरिकांनी सिद्ध करून दाखवत. 'इच्छा असेल तर मार्ग दिसेल' म्हणतात ना तसे व्यसनाधीनमुक्त होण्याची आदर्श संकल्पना राबवित गावात दोन ते तीन महिन्यांत जवळपास 40 ते 50 जण दारूच्या व्यसनातुन मुक्त झाले आहेत.

सध्या असे गाव नाही की, तिथे दारूचे व्यसनाधीन नागरिक नाहीत. युवकांपासुन वयोवृद्ध व्यक्ती या व्यसनाच्या विळख्यात सापडलेले आहेत. हे व्यसन म्हणजे समाजात पसरणारा 'एक महाभयंकर साथीचा रोगच' म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या दारूच्या व्यसनामुळे अनेकांचे संसार उद्धवस्त देखील झाले आहेत. प्रत्येक गावात दारूच्या व्यसनात आहारी गेलेले अनेकजण चांगले सुशिक्षित नागरिक पहायला मिळतात तशीच परिस्थिती उपळाई बुद्रूक येथे देखील होती. गावातील सर्वसामान्य नागरिकांसह, उच्च शिक्षण घेतलेलेही काहीजण मित्रांच्या संगतीमुळे व्यसनात अडकले होते. त्यांची सकाळची सुरुवातच दारू पिऊन होत असल्याने, दिवसभर इकडुन- तिकडुन उसानवारी करून दारुच्या नशेत राहत असत. परिणामी गावात या व्यसनाधीन नागरिकांचे समाजातील मानसन्मान देखील ते हरवुन बसले होते. परंतु याची काळजी या व्यसनाधीन लोकांना नव्हती.

व्यसनाधीन लोकांच्या कुटुंबातील सदस्यांनी दारूचे व्यसनापासून सोडवण्यासाठी अनेक दवाखाने तसेच अनेक प्रयत्न केले होते. परंतु गावातील काही ठराविक लोक काही केले तरी व्यसनातुन बाहेर पडायलाच तयार नव्हते. परंतु गावातील काही अस्सल दारूचे व्यसनाधीन असलेले नागरिक समुपदेशाने दारूच्या व्यसनातुन मुक्त झाले. व संसारात रमले. त्यामुळे गावातील अनेकांनी एकत्र येत दारुमुक्तीचा संकल्प करत व्यसनमुक्तीसाठी सरसावले. त्यामुळे ज्यांची दारू समुपदेशाने सुटली आहे. त्यांनी गावातील इतर जे दारूच्या व्यसनात आहारी गेलेले आहेत. त्यांचे समुपदेशन करत त्यांना देखील दारूच्या व्यसनातुमुक्त केले. त्यामुळे गावात गेल्या दोन महिन्यांत जवळपास 40 ते 50 जण दारूच्या व्यसनातुन बाहेर पडत. कामधद्यांला लागले असल्याने, कुटुंबातील सदस्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळ्या प्रकारचा आनंद आहे. जे कधीच दारूच्या व्यसनातुन बाहेर पडु शकणार नाही. असे लोक देखील आज दारूच्या व्यसनातुन बाहेर पडल्याने, या संकल्पनेचे गावातुन कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com