शुक्रवारी नवे 2123 कोरोनाबाधित ! 56 जणांचा मृत्यू; ऍक्‍टिव्ह रुग्णसंख्या 19353

शुक्रवारी दोन हजारांहून अधिक कोरोना बाधित रुग्ण आढळून आले
corona
coronaMedia Gallery
Updated on

सोलापूर : ग्रामीण भागात 1966 तर महापालिका हद्दीत 157 अशा एकूण 2123 नव्या कोरोना (Covid-19) बाधित रुग्णांची भर आज जिल्ह्याच्या आकडेवारीत पडली आहे. ग्रामीण भागातील 42 तर महापालिका हद्दीतील 14 अशा एकूण 56 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे आजच्या अहवालातून समोर आले आहे. (More than two thousand corona-infected patients were found on Friday)

रुग्णालयात सध्या 19 हजार 352 ऍक्‍टिव्ह कोरोना बाधित रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामध्ये 17519 रुग्ण हे ग्रामीण भागातील तर 1773 रुग्ण हे महापालिका हद्दीतील आहेत. आज एकाच दिवशी 1434 जण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्यामध्ये ग्रामीण भागातील 1308 तर महापालिका हद्दीतील 126 रुग्णांचा समावेश आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित व्यक्तींची संख्या आता एक लाख 14 हजार 508 झाली आहे. त्यातील 88 हजार 26 रुग्ण हे ग्रामीण भागातील तर 26 हजार 482 रुग्ण महापालिका हद्दीतील आहेत. त्यापैकी 92 हजार 71 जण आतापर्यंत कोरोना मुक्त झाले आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत 3 हजार 85 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील 1860 जण हे ग्रामीण भागातील 1225 हे महापालिका हद्दीतील आहेत.

corona
एमआयएमचे शहराध्यक्ष शाब्दी म्हणाले, कोरोनाचे अपयश झाकण्यासाठी कडक लॉकडाउनचा निर्णय !

माळशिरसमध्ये एकाच दिवशी 556 नवे कोरोना बाधित

ग्रामीण भागात आज नव्याने आढळलेल्या 1966 कोरोनाबाधित रुग्णांमधील 556 रुग्ण हे एकट्या माळशिरस तालुक्‍यातील आहेत. अक्कलकोट तालुक्‍यातील 54, बार्शी तालुक्‍यातील 106, करमाळा तालुक्‍यातील 242, माढा तालुक्‍यातील 284, मंगळवेढा तालुक्‍यातील 82, मोहोळ तालुक्‍यातील 131, उत्तर सोलापूर तालुक्‍यातील 55, पंढरपूर तालुक्‍यातील 353, सांगोला तालुक्‍यातील 29, दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील 74 नव्या रुग्णांची भर पडली आहे.

चार तालुक्‍यांत प्रत्येकी सहा मृत्यू

ग्रामीण भागातील 42 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे आजच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. अक्कलकोट, माळशिरस, मंगळवेढा आणि दक्षिण सोलापूर या चार तालुक्‍यातील प्रत्येकी सहा व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मोहोळ तालुक्‍यातील सात, बार्शी तालुक्‍यातील पाच, करमाळा तालुक्‍यातील तीन, उत्तर सोलापूर तालुक्‍यातील एक व पंढरपूर तालुक्‍यातील दोन व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे आजच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Shaktipeeth Highway Protest raju shetti in solapur
Devotees Shocked in Pandharpur After Claims of Paid Vithal Darshan Surface
Cattle Transport Truck Meets With Accident in Solapur’s Mohol Taluka
ATM Pulled Out and Fled in Car; Major Theft Incident Shocks Solapur
Marathi News Esakal
www.esakal.com