
सोलापूर: ‘तू शेत वहिवाटू नकोस, तू शेतात यायचे नाही, कोर्टातील वाद मिटेपर्यंत शेतात येऊ नको’ असे म्हणून सवत, सावत्र मुलासह दीर व दिराच्या मुलाने शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण केल्याची फिर्याद लक्ष्मी पांडुरंग केसकर (वय ६०, रा. केसकरवाडी, ता. पंढरपूर) यांनी पंढरपूर ग्रामीण पोलिसांत दिली आहे.