
सोलापूरः स्पर्शज्ञान व ब्रेल लिपी आधारे शिकणाऱ्या दृष्टीबाधित विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कोरोना संकटात नेमके कशा पद्धतीने शिक्षण द्यायचे या प्रश्नाचे उत्तर सापडत नसल्याने नसल्याने या क्षेत्रातील विद्यार्थ्यासह संस्थाचालक व पालकांची कोंडी झाली आहे.
राज्यभरात या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण दिले जाते. पहिली ते पाचवीपर्यंत या मुलांना शिक्षण दिले जाते. नंतर त्यांना निवासी शाळांमध्ये पुढील शिक्षणाची सोय केली जाते. सोलापूर जिल्ह्यात अशा प्रकारच्या तीन संस्था आहेत. राज्यात जनगणनेनुसार दृष्टीबाधितांची संख्या ही सहा लाखपर्यंत आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या अंदाजे पाच ते सहा हजार एवढी आहे. प्रतिकूल आर्थिक स्थिती व शैक्षणिक सोयीचा अभाव यामध्ये या मुलांचे शिक्षण अडकलेले आहे.
कोरोना संकटात या विशेष मुलांच्या शिक्षणाचे अधिकच हाल झाले आहेत. एक तर त्यांच्या शाळाच उघडलेल्या नाहीत. शासनाने शाळा सुरू करण्याबाबत आदेश काढले तरी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे प्रश्न अत्यंत वेगळे आहेत.
हेही वाचाः पंढरपूर येथील मक्याची हमीभाव खरेदी रखडली
ऑनलाइन शिक्षणाचा सर्वत्र गाजावाजा चालवला असला तरी या विद्यार्थ्यांचे शिक्षण केवळ स्पर्शाच्या माध्यमातून करावे लागते. त्यांना ब्रेल लिपी ही स्पर्शाद्वारे शिकवली जाते. तसेच शाळा सुरू करण्याच्या दृष्टीने सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंगच्या अटी पाळणे शिक्षण संस्थांसाठी अत्यंत अवघड झाले आहे. जून महिना सुरू झाला तरी प्रत्यक्षात काहीही झालेले नाही.
दृष्टीबाधितांसाठी काम करणाऱ्या नॅब (नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड)ने शासनाकडे पत्र व्यवहार करून या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी निश्चित धोरण ठरवण्याचा आग्रह चालवला आहे. बहुतांश विद्यार्थी प्रतिकूल परिस्थीतीत शिक्षण घेतात. कोरोना संकटात शाळेत पोहोचणे त्यांना अडचणीचे बनले आहे. निवासी शाळामध्ये संसर्गामूळे त्यांना ठेवता येत नाही.
शाळासाठी थर्मल स्क्रिनिंग यंत्र घ्यायचे तर त्याची किंमत चार हजार रुपये आहे. 50 विद्यार्थ्याला एक यंत्र या प्रमाणे यंत्र घेण्यासाठी संस्थाकडे निधी नाही. या मुलांना घरून शाळेत पोचवण्याची अडचण मोठी आहे. शाळेमध्ये क्वांरटाइन सेंटर असावे, अशी सूचना आहे. या सर्व नियमांची जंत्री पाहता प्रत्यक्षात या विद्यार्थ्यांच्या शाळा कधी सुरू होतील याचे उत्तर सध्या तरी दिसत नाही.
धोरणात्मक निर्णय हवा
शासनाकडे कोरोना संकटामध्ये आम्ही मुलांच्या शिक्षणासाठी निश्चित धोरण ठरावे असा पाठपुरावा करीत आहोत.
- मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, संयुक्त सचिव, नॅब महाराष्ट्र
शाळा सुरू करण्याची अडचण
सोलापूरमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या शाळामध्ये अद्याप तरी शिक्षण देण्याबाबत काहीही करता आलेले नाही. शासनाच्या मार्गदर्शनाची प्रतिक्षा आहे.
- प्रकाश यलगुलवार, अध्यक्ष, नॅब सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.