इंधन दरवाढीविरोधात जनवादी महिला संघटनेचे आंदोलन | Solapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 इंधन दरवाढीविरोधात जनवादी महिला संघटनेचे आंदोलन

सोलापूर : इंधन दरवाढीविरोधात जनवादी महिला संघटनेचे आंदोलन

सोलापूर : केंद्र सरकारच्या अनियंत्रित दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. घर चालविताना महिलांना नाकीनऊ येत आहे, याचा सूड जनता निवडणुकीत नक्कीच घेणार आहे, अशा शब्दांत नसीमा शेख यांनी टिका केली.

अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने पेट्रोल, डिझेल, दैनंदिन जीवनावश्‍यक वस्तूंची दरवाढ व वाढती महागाई विरोधात देशव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली होती.

हेही वाचा: नियोजन उणे नागरिक वाहतूक कोंडी

त्याअनुषंगाने सोलापूर जिल्हा समितीच्या वतीने संघटनेच्या राज्यध्यक्षा माजी नगरसेविका नसीमा शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापुरात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्वा जिल्हाध्यक्षा माजी नगरसेविका शेवंता देशमुख यांनी केले. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले. संघटनेच्या सचिवा शकुंतला पाणीभाते, लिंगवा सोलापूरे, गीता वासम, लता तुळजापूरकर, जमेला शेख आदींची उपस्थिती होती.

loading image
go to top