
-अण्णा काळे
करमाळा : स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी होण्यासाठी पुणे येथे गेलेला आवाटी (ता. करमाळा) येथील प्रशांत ब्रह्मदेव बंडगर हा विद्यार्थी ३१ मे रोजी पुणे येथे झालेल्या अपघातात जखमी झाला. प्रशांत बंडगर याचा एक पाय फ्रॅक्चर झाला असून त्याचे ऑपरेशन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांचे वडील ब्रह्मदेव बनकर यांनी दिली. अपघातात जखमी झाल्यामुळे प्रशांतला महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आज (१ जून) घेण्यात आलेल्या गट क संयुक्त पूर्व परीक्षेला बसता आले नाही.