

Solapur Shocked as MSEDCL Engineer Held for Bribe Demand
सोलापूर : सौरऊर्जा संच मागणी अर्जास ऑनलाइन मंजुरी देण्यासाठी तीन हजारांची लाच घेतल्याप्रकरणी महावितरणच्या जुळे सोलापूर शाखेचे सहायक अभियंता अमित विलासराव रेडेकर (वय ४२, रा. गॅलेक्सी अपार्टमेंट, सिंधू विहार, जुळे सोलापूर, मूळ रा. रेडेकर गल्ली, उचगाव, ता. करवीर, जि. कोल्हापूर) यांच्याविरुद्ध विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.